आसाराम बापूंचा विरार आश्रम तोडण्यास सुरूवात
विरारमध्ये आसाराम बापूंचा आश्रम तोडण्यास सुरुवात करण्यात आलीय.. तहसीलदारांनी आश्रम अनधिकृत असल्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत. कुंभारपाडामध्ये हा आश्रम आहे.
Nov 7, 2013, 02:44 PM ISTदोन महिन्यांनंतर आसाराम बापूवर चार्जशीट दाखल!
अल्पवयीन मुलींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर आज जोधपूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
Nov 6, 2013, 03:06 PM ISTसुरतच्या डीसीपींना नारायण साई समर्थकाकडून जीवे मारण्याची धमकी
नारायण साईंविरोधातल्या बलात्कार प्रकरणात चौकशी करत असलेल्या सुरतच्या पोलीस अधिकारी शोभा भुताडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नारायण साईंविरोधात यापुढं अधिक चौकशी कराल तर जीव गमवावा लागेल या भाषेत त्यांना धमकावण्यात आलंय.
Oct 21, 2013, 02:48 PM ISTआसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत
सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.
Oct 15, 2013, 04:53 PM ISTफरार नारायण साई नेपाळमध्ये गेल्याची शंका
लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.
Oct 8, 2013, 11:22 AM ISTआसाराम बापूंवर पुन्हा बलात्काराचा आरोप, मुलगाही अडचणीत
आसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. सुरत मधील दोघा बहिणींनी आसाराम बापू आणि त्यांचा पूत्र नारायण साई यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलाय.
Oct 6, 2013, 10:14 AM ISTआसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अटकेत असलेले आसाराम बापू यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीये. आता १ ऑक्टोबरपर्यंत बापूंचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.
Sep 19, 2013, 08:30 AM ISTट्विटरवर आसारामच्या वकिलांची `छी...थू`!
‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असं सांगत आसाराम बापू निर्दोष आहे असं सांगणाऱ्या ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांची सोशल नेटवर्किंग साईटवर ‘छी...थू’ होताना दिसतेय.
Sep 18, 2013, 10:22 AM ISTआसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप प्रकरणी कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना गजाआडच राहावं लागणार आहे. आसाराम बापूंसह त्यांचा सहकारी शिवाचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Sep 16, 2013, 01:02 PM ISTआसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
आसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बापूंची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार असल्यामुळं त्यांना आज पुन्हा जोधपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळं कोर्ट त्यांना जामीन मंजूर करतं, की पुन्हा कोठडी सुनावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Sep 16, 2013, 10:12 AM ISTमनपाने हटवलं आसाराम बापूंच्या आश्रमाचं अतिक्रमण
देशात सगळीकडेच आसाराम बापूंच्या गैरकारभाराचे किस्से चर्चेत असताना नाशिकमध्येही त्यांच्या आश्रमाचं अतिक्रमण हटवलं. यावेळी साधक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
Sep 12, 2013, 06:43 PM ISTआसाराम बापूंचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात करणार सादर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेले संत आसाराम बापू यांचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. काल जोधपूरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये आसाराम बापूंचा एमआरआय काढण्यात आला. आसाराम बापू मागील १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
Sep 10, 2013, 01:09 PM ISTआसाराम बापूंचा साधक बेपत्ता!
अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.
Sep 8, 2013, 01:29 PM ISTआसाराम बापूची जेलमध्ये भलतीच मागणी
न्यायालयीन कोठडीत असलेले वादग्रस्त अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आता जास्तच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. जोधपूर पोलीस सध्य़ा एका सिडीच्या शोधात आहेत. तपासात जर ती सीडी सापडली तर आसाराम बापूंची संकट वाढणार आहेत. दरम्यान, आसाराम बापूंनी आजारावर उपचारासाठी एका महिला वैद्यची मागणी जेल प्रशासनाकडे केली आहे.
Sep 6, 2013, 03:03 PM ISTजामीनासाठी आसाराम बापूंची हायकोर्टाकडे धाव!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू जामीनासाठी आता हायकोर्टात घेणार आहेत. जोधपूर कोर्टानं काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. आता उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
Sep 5, 2013, 11:04 AM IST