www.24taas.com , झी मीडिया, सूरत
लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.
नारायण साईंवरही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. कालच सूरत पोलिसांनी नारायण साईला लुकआऊट नोटीस बजावलीय. आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई विरोधात दोन बहिणींनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच सूरत पोलिसांनी त्यांना लुकआऊट नोटीस बजावली. मात्र नारायण साई फरार आहे.
सूरत पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले, “आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई विरोधात लुकआऊट नोटीस जारी केलाय. ही नोटीस म्हणजे त्यांनी देशाबाहेर जावू नये म्हणून उचललेलं एक पाऊल आहे. आम्ही तपास सुरू केलाय. नारायण साईला शोधण्याचं काम सुरू आहे. नारायण साई जिथं जावू शकतो अशा ठिकाणांची तपासणी आम्ही केलीय.”
नारायण साई विरोधात सूरतच्या जहांगीरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. ज्या दोन बहिणींनी आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केलाय. त्यातल्या मोठ्या बहिणीनं आसाराम बापूंविरोधात केलेल्या तक्रारीत म्हटलं की, १९९७ ते २००६ दरम्यान त्यांच्यावर अनेक वेळा अत्याचार झाला. अहमदाबादच्या बाहेर असलेल्या आश्रमात त्या राहत होत्या. तर लहान बहिणीनं नारायण साईंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यात सूरतमध्ये २००२ ते २००५ दरम्यान अत्याचार झाल्याचं तिनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.