आसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत

सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 15, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.
यासंदर्भात आज आसाराम बापूंना गांधीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मात्र हे प्रकरण जुनं असल्यामुळं पोलिसांनी चौकशीसाठी कोर्टाकडं अधिक वेळ मागितली. त्यामुळं आसाराम बापूंना दोन आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आसाराम बापू आतापर्यंत जोधपूरला न्यायालयिन कोठडीत होते.
तर दुसरीकडे आसाराम यांचे पुत्र नारायणसाई यांच्या याचिकेवरील सुनावणी मात्र १७ ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, आसाराम बापूंनी आज पुन्हा आपल्या अटकेमध्ये सोनिया गांधी आणि राहूल गांधींचा हात असल्याचा आरोप केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.