अण्णांचे उपोषण आता मुंबईत
अण्णा हजारे उपोषणासाठी मुंबईत बसू शकणार आहेत. उपोषणासाठी MMRDA च्या मैदानाची परावनगी मिळाली आहे. बीकेसीतील मैदानाची 13 दिवसांसाठी परवानगी मिळाली आहे. अण्णांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये उपोषण करण्याची परवानगी मागितली होती.
Dec 22, 2011, 07:45 PM ISTएमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं
लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय.
Dec 20, 2011, 01:48 PM ISTसेनेचा लोकपाल आधी विरोध, आता पाठिंबा
लोकपाल विधेयकाला शिवसेना संसदेत पाठिंबा देणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशींनी पुण्यात दिली आहे. त्यामुळं एकंदरीत लोकपालच्या मुद्यावर सुरूवातीला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यु टर्न घेतल्याचं दिसून येतंय.
Dec 18, 2011, 04:59 PM IST'गांधी' विरूद्ध 'गांधी'!
पु्ण्यातल्या गांधी स्मारक निधीच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे 'आजचे गांधी' म्हणवले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेचे तत्कालीन विश्वस्त असल्याने त्यांचंही नाव यात जोडलं जातंय.
Dec 16, 2011, 11:19 AM ISTअण्णांना आव्हाडांची 'थप्पड'
नगरपालिका निवडणुकीत अण्णा फॅक्टर चालला नसल्याचे वक्तव्य माणिकराव ठाकरेंनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात मतदारांनी अण्णांच्या श्रीमुखात भडकावली. अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले होते.
Dec 15, 2011, 04:34 PM ISTअण्णांचे उपोषण मुंबईत होण्याची शक्यता
राजधानी दिल्लीतल्या कडक्याच्या थंडीमुळे अण्णा हजारे लोकपाल विधेयकाच्या मुद्दावर या महिन्यात रामलीला मैदानाच्या ऐवजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करु शकतात. अण्णा हजारेंच्या कोअर कमिटीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Dec 14, 2011, 05:44 PM ISTलोकपालचं काय होणार?
लोकपलाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 14, 2011, 06:00 AM ISTनिवडणुकीत 'अण्णा' !
कोणत्याही उमेदवारानं निवडणूक प्रचारात आपलं नाव वापरू नये अशी तंबी अण्णा हजारेंनी दिली तरी पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेतल्या भाजपच्या एका उमेदवारानं नगरपरिषद निवडणुकीत अण्णांचं नाव आणि अण्णांसोबतचा फोटोही वापरलाय.
Dec 11, 2011, 03:51 AM IST'शेवटच्या श्वासापर्यंत लढेल'- अण्णा
संसदेत लोकपाल बिलावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे लोकपाल बिल सक्षम असावे यासाठी अण्णा हजारे उद्या पुन्हा एकदा एका दिवस उपोषण करणार आहेत.
Dec 10, 2011, 04:23 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTराहुल बोले, सरकार चाले- अण्णा
कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.
Dec 2, 2011, 01:54 PM ISTलोकपालच्या बाहेर 'क्लास' थ्री
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतलाय. तर लोकपालच्या कक्षेत सर्व कर्मचारी आणि पंतप्रधान यायला हवेत, असं पुण्यात अण्णा हजारेंनी स्पष्ट केलय.
Dec 2, 2011, 11:49 AM ISTराणेंचा अण्णांवर 'प्रहार'
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष बनवत हल्लाबोल केला आहे. राणेंच्या 'प्रहारा'वर अण्णा काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
Dec 2, 2011, 08:48 AM ISTसरकारची नियत साफ नाही – अण्णा हजारे
सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला. राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला.
Nov 30, 2011, 01:16 PM IST