'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM ISTअण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
Jul 24, 2012, 07:00 PM ISTअण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट
अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
Jul 18, 2012, 11:03 PM ISTअण्णा-बाबा करणार 'निर्णायक' आंदोलन
लोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन करणार आहेत.
Jul 17, 2012, 12:35 PM ISTदेशाचा राष्ट्रपती निष्कलंक हवा- अण्णा हजारे
देशाचा राष्ट्रपती निष्कलंक असावा असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. देशाचा राष्ट्रपती हा देशाचा आदर्श असतो. अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती निवडणूकिबाबत त्याचं मत वक्त केलं.
Jun 16, 2012, 06:51 PM ISTमी देशद्रोही.. तर तुरुंगात टाका - अण्णा
टीम अण्णाच्या आंदोलनामागे परदेशी शक्ती असल्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आरोपाला आज अण्णांनी उत्तर दिलय. आंदोलनामागे परदेशी शक्ती असतील, तर त्याचे पुरावे द्या, असा पलटवार अण्णांनी केलाय. आपण जर देशद्रोही आहे, असं सरकारला वाटतं असेल, तर सरकारने तुरुंगात टाकावे असं आव्हान अण्णांनी दिले आहे.
Jun 12, 2012, 10:19 PM ISTअण्णांच्या संघटनांमध्ये मतभेद
भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं.
Jun 6, 2012, 10:12 AM ISTअण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेट
केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jun 4, 2012, 08:24 PM IST'भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर'
सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात सचिननं संसदेत फटकेबाजी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आम्ही संसदेबाहेरुन पाठिंबा देऊ, अशी ग्वाही अण्णांनी यावेळी दिली आहे.
Jun 4, 2012, 07:46 PM IST'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
Jun 1, 2012, 04:51 PM ISTकेजरीवाल यांच्याविरोधात नाही - किरण बेदी
टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्हंटलं आहे.
May 26, 2012, 05:45 PM IST...अन् अण्णाही आता थकले !!!
राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्य व्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदूरबारचा नियोजित दौरा रद्द केला आहे. अण्णांना थकवा जाणवू लागल्य़ानं त्यांनी नंदूरबारला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
May 22, 2012, 05:22 PM ISTअण्णांवरील हल्ल्याचे राऊतांकडून समर्थन!
नागपुरात अण्णांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. यात अण्णा हजारे विरुद्ध नितीन राऊत असा नवा संघर्ष पेटलाय. काल रात्री जेव्हा ताफ्यातल्या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत त्याठिकाणी उपस्थित होते.
May 17, 2012, 06:49 PM ISTपाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे
राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.
May 17, 2012, 10:24 AM ISTअण्णा हजारेंच्या गाडीवर नागपुरात हल्ला
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर आज काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अण्णा सुरक्षित असून हा हल्ला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
May 16, 2012, 07:57 PM IST