अण्णांचे उपोषण मुंबईत होण्याची शक्यता

राजधानी दिल्लीतल्या कडक्याच्या थंडीमुळे अण्णा हजारे लोकपाल विधेयकाच्या मुद्दावर या महिन्यात रामलीला मैदानाच्या ऐवजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करु शकतात. अण्णा हजारेंच्या कोअर कमिटीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Updated: Dec 14, 2011, 05:44 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जर लोकपाल विधेयक पारित झालं नाही तर २७ डिसेंबर पासून अण्णांच्या उपोषणा संदर्भात तसंच अन्य महत्वाच्या विषयांवर कोअर कमिटीत विचार विमर्श करण्यात आला. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की संसदेत लोकपाल विधेयक पारित झालं नाही तर अण्णा २७ डिसेंबरला उपोषणाला बसतील.

 

संसदेत काय होतं त्यावर उपोषणाला बसायचा का विधेयक पारित झालं तर जल्लोष याचा निर्णय घेण्यात येईल. काहीही झालं तरी लोकं मोठ्य़ा संख्येने जमा होतील. अण्णा हजारेंनी सिटीझन चार्टरच्या सरकारी प्रस्तावा संदर्भात टीका करताना हे संसद तसंच त्यांना दिलेल्या आश्वासनांच्या विरुध्द असल्याचं सांगितल .