GAIL Job: गेल इंडियामध्ये बंपर भरती, दीड लाखांपर्यंत पगार

Gail Recruitment 2024: . गेल इंडिया लिमिटेडमध्ये सिनीयर इंजिनीअर आणि सीनियर ऑफिसरसहित अनेक पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 14, 2024, 05:02 PM IST
GAIL Job: गेल इंडियामध्ये बंपर भरती, दीड लाखांपर्यंत पगार title=
गेल इंडिया भरती

Gail Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सिनीयर इंजिनीअर आणि सीनियर ऑफिसरसहित अनेक पदे भरली जाणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

गेल इंडिया ही भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. याअंतर्गत मार्केटिंग, इंजिनीअरिंग, ह्यूमन रिसॉर्स, मेडिकल सर्व्हिस, सिक्योरिटीसहीत विविध विभागांमध्ये सिनीयर इंजिनीअर, सिनीअर इंजिनीअर आणि ऑफिसरची अनेक पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत सिनीअर इंजिनीअरची 98 पदे, सिनीयर ऑफिसरची 130 पदे, ऑफिसरची 33 पदे अशी एकूण 261 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

गेल भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी रसायन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/एलएलबी/एमबीएची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त कॉलेज, संस्था आणि विद्यापीठातून संबंधित शिक्षण घेतलेले असावे. बॅचलर पदवीमध्ये किमान 65 टक्के मिळालेले असावे.

वयोमर्यादा

सिनीयर इंजिनीअर आणि सिनीयर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. तर अधिकारी (प्रयोगशाळा) या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय 32 वर्षे असावे. अधिकारी (सुरक्षा) साठी कमाल वय 45 वर्षे आणि अधिकारी (राजभाषा) साठी उच्च वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. 

किती मिळेल पगार? 

सिनीअर इंजिनीअर आणि सिनीअर ऑफिसर या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपयांदरम्यान पगार दिला जाणार आहे. 

कशी असेल निवड प्रक्रिया?

गेल भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, गट चर्चा, मुलाखत अशा टप्प्यांतून होणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना, अनारक्षित, ईडब्ल्यूएस, ओबीसी (एनसीएल) श्रेणीतील उमेदवारांकडून 200 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. GAIL India च्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा