अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'
टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.
Aug 6, 2012, 02:42 PM ISTअण्णा समर्थकांनीच जाळला अण्णांचा पुतळा
जंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.
Aug 4, 2012, 03:04 PM IST'अण्णा'गिरी ते 'नेता'गिरी
नैतिकता आणि प्रामाणिकपणा यामुळं विरोधकांनीही आत्तापर्यंत अण्णांवर थेट आरोप करणं टाळलं. गेल्या तीन दशकांत ज्येष्ठ समाजसेवक असणा-या अण्णांवर अशाप्रकारे आरोप करणा-यांवर तोंडावर आपटण्याची वेळ आली.
Aug 4, 2012, 08:50 AM ISTआता आरपारची लढाई - अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा उपोषण सोडण्याचा निर्णय आणि राजकारणात उडी घेण्याची केलेली घोषणा यामुळे आंदोलनाचे वातवरणच पलटून गेले आहे. अण्णांचा हा निर्णय नव्या पर्वाची सुरुवात की जुन्या पर्वाचा शेवट? याबाबत उत्सुकता शिगेला पोहली होती. जंतरमंतरवर लाखोंच्या उपस्थित अण्णा हजारे यांनी आता आरपारची लढाई, असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर एकच जलोष पाहायला मिळाला.
Aug 3, 2012, 06:27 PM ISTअण्णांच्या निर्णयाचे स्वागत, विरोध आणि ऑफर
सरकारने जनतेचा आवाज ऐकण्यास नकार दिल्यामुळंच उपोषण सोडण्याचा निर्णय घेऊन राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याचं स्पष्टीकरण टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी दिलंय.
Aug 3, 2012, 04:36 PM ISTअण्णांची घोषणा, सोडणार उपोषण
जंतर-मंतरवर गेल्या नऊ दिवसापासून सुरु असलेले टीम अण्णाचे आंदोलन अखेर शुक्रवारी सायंकाळी सुटणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द अण्णा हजारे यांनी आज दुपारी जंतरमंतरवर केली.
Aug 3, 2012, 03:17 PM ISTअण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'
अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.
Aug 2, 2012, 05:43 PM ISTअण्णांचा 'रिस्की टर्न'
भारतकुमार राऊत
अण्णांनी जो पवित्रा घेतला आहे,त्यामागे खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात जेवढ्या सामाजिक क्रांती घडल्यात, त्यांचा मार्ग हा सामाजिक ते राजकीय असाच होता.
'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'
टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
Aug 2, 2012, 01:57 PM ISTआत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.
Aug 1, 2012, 04:39 PM ISTअण्णांनी मागितली माफी, 'आंदोलन इथेच थांबवेन'
टीम अण्णांच्या वतीने अण्णा हजारे यांनी माफी मागितली आहे. अण्णा हजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली, आणि दु:खही व्यक्त केलं. अण्णांच्या समर्थकांनी मीडियाशी हुल्लडबाजी केल्याने अण्णांनी स्वत: माफी मागितली आहे.
Jul 31, 2012, 04:08 PM ISTशरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करण्यात आलीत. अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी ही निदर्शनं केली आहे.१५ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि लोकपालच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे आणि टीम अण्णा जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे.
Jul 30, 2012, 04:47 PM ISTसोनिया-राहुल यांना आव्हान म्हणजे हत्तीशी टक्कर!
आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे.
Jul 29, 2012, 06:52 PM ISTजनतेच्या हितासाठी राजकारणात - अण्णा हजारे
जनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Jul 27, 2012, 12:17 PM IST