अण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.
May 11, 2012, 06:38 PM ISTमनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा
महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.
May 5, 2012, 08:59 AM ISTबाबा रामदेवांच वक्तव्य योग्यच- अण्णा
भारताच्या संसदेत खुनी मंत्री बसले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
May 2, 2012, 02:57 PM ISTअण्णांच्या दौऱ्याचा शिर्डीपासून प्रारंभ
जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनानंतर सक्षम लोकायुक्ताच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज शिर्डीपासुन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत आहेत. अलीकडे मुंबईत झालेल्या अण्णांच्या आंदोलनाकडे जनतेने पाठ फिरवल्यामुळे हा दौरा अधिक प्रभावी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे
May 1, 2012, 08:14 AM ISTराज्यातील जनतेला जागृत करणार- अण्णा
सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.
Apr 26, 2012, 08:22 PM ISTराज ठाकरे म्हणतात, अण्णा लक्ष द्या
अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.
Apr 26, 2012, 03:25 PM ISTअण्णांची भेट : राजनी स्वीकारली, बाळासाहेबांनी नाकारली
सक्षम लोकायुक्तासाठी मुंबईत आलेल्या अण्णा हजारेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भेट नाकारली आहे. त्यामुळं अण्णा आणि बाळासाहेबांच्या भेटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. बाळासाहेबांनी अण्णांना भेटीची वेळ दिलेली नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेट स्वीकारली. त्यामुळे भ्रष्ट्राचाराबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Apr 26, 2012, 02:25 PM ISTआमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे
मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.
Apr 23, 2012, 02:18 PM ISTकाळापैसा जनतेचा, अण्णांचे ऑगस्टला आंदोलन
महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Apr 20, 2012, 04:31 PM ISTअण्णा परदेशी पैशावर नाचणारा 'मोर'- बाळासाहेब
अण्णाचं नावचं घेऊ नका, परदेशी पैशावर नाचणारा तो मोर आहे, लांडोर आहे.' 'ह्याच्यावर आरोप करा, त्याचावर आरोप करा', ' तुम्ही कोण इतरांना सांगणारे.' असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्य़ा ठाकरी शैलीत अण्णांना खडे बोल सुनावले. '
Mar 29, 2012, 05:35 PM ISTभ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा
केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.
Mar 28, 2012, 03:22 PM ISTअण्णांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
देशाला राजकारण्यांनी लुटलं आहे. आता देशाच्या मालकांना जागा आली आहे. जनतेने जागरुक राहिले पाहिजे. आता दिल्ली निवडणुकीसाठी तयारी करणार. कर्जाचे व्याज देण्यासाठी देशाला परत कर्ज घ्यावे लागत आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी ही लढाई आहे.
Mar 28, 2012, 03:20 PM ISTअण्णांचा सल्ला, तरुणांनी रस्त्यावर यावं!
जनलोकपालसाठी देशातल्या तरुणांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलयं. जळगावात अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अण्णांनी जनलोकपालविषयी आपली भूमिका मांडली.
Mar 28, 2012, 11:46 AM IST'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्यं अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. मांडण्यात आलेल्या ठरावावर आता चर्चा सुरू झाली आहे.
Mar 27, 2012, 06:26 PM ISTटीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव
संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा हा डाव असल्याचा आरोप अण्णा समर्थकांतून करण्यात येत आहे.
Mar 27, 2012, 11:21 AM IST