'वास्तव' चित्रपटातला संजय दत्तचा जिगरी मित्र 'देड फुटिया', 25 वर्षानंतर किती बदलला

संजय दत्तचा 'वास्तव' चित्रपट 1999 मध्ये रीलिज झाला होता. या चित्रपटात एका अभिनेत्याचे नाव 'देड फुटिया' असे होते. जो संजय दत्तचा अगदी जवळचा मित्र होता. या दोघांची जोडी तर त्या काळी खूपच गाजली होती. तर पाहुयात आता हाच 'देड फुटिया' 25 वर्षांनंतर कसा दिसतो. 

Intern | Updated: Nov 14, 2024, 05:11 PM IST
'वास्तव' चित्रपटातला संजय दत्तचा जिगरी मित्र 'देड फुटिया', 25 वर्षानंतर किती बदलला  title=

संजय दत्तच्या 'वास्तव' चित्रपटानंतर या अभिनेत्याचे अगदी आयुष्यचं बदलले. या चित्रपटात संजय दत्तसोबत नम्रता शिरोडकर, परेश रावल, संजय नार्वेकर यांसारखे दिग्गज कलाकार होते . संजय दत्तचा जिगरी मित्राचे पात्र संजय नार्वेकर यांनी केले होते. या चित्रपटातून संजय नार्वेकरांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. संजय दत्त आणि संजय नार्वेकर या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले होते . आता या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.  या चित्रपटानंतर देड फुटिया सुद्धा खूप बदलला आहे. त्याला ओळखणे आता खूपच कठीण झाले आहे. 

संजय नार्वेकर हा एक मराठी अभिनेता आहे. मराठी चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट 'ये रे ये रे पैसे 2' होता. या चित्रपटात त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. या अभिनेत्याने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'खबरदार', 'अगं बाई अरेच्चा', 'जबरदस्त', यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, अभिनेत्याला खरी ओळख ही 'वास्तव' चित्रपटामुळे मिळाली. संजय दत्तसोबत केलेला हा चित्रपट आणि त्यातील दोघांच्या मैत्रीला खूप प्रेम मिळाले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 संजय नार्वेकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात पापाराझींसमोर तो पोज देत आहे. 25 वर्षांनंतर त्याचा लूक खूपच बदललेला दिसत आहे. अनेक जण त्याला ओळखू देखील शकले नाहीत . 'वास्तव' चित्रपटाचा देड फुटिया जीप समोर उभा राहून पोज देत आहे . या व्हिडीओवर भरपूर लोकांनी कंमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले- सर तुम्हाला तर पोलिसांचा रोल दिला गेला पाहिजे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले- देड फुटिया, तर काही नेटकऱ्यांनी देड फुटियाचे डायलॉग लिहिले. संजय नार्वेकरांचा हा लूक पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत.