जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM IST‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
Dec 13, 2013, 10:02 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM ISTअण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय
व्ही. के. सिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांची चांगलीच खरडपट्टी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. त्यांना जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, अण्णांचे आंदोलन वादाचा आखाडा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Dec 13, 2013, 03:16 PM ISTअण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
Dec 13, 2013, 11:31 AM ISTलोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM IST`आप` यहाँ आए किस लिए?... वाढला अण्णांचा `ताप`!
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत... परंतु त्यांनी पाठवलेल्या अन्य तीन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि उपस्थितीमुळे अण्णांचा `ताप` मात्र नक्की वाढलाय.
Dec 12, 2013, 07:50 PM ISTअण्णांच्या आंदोलनात ‘आप’च्या नेत्यांचा अपमान!
अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस... आज अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहणार होते.
Dec 12, 2013, 07:42 PM ISTअण्णा हजारे यांची भेट टळली, केजरीवाल आजारी
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.
Dec 12, 2013, 09:17 AM IST`झी मीडिया`च्या दणक्यानंतर केजरीवाल यांना सुचली उपरती
दिल्लीत मिळालेल्या यशानं आपण हुरळून गेलो नाहीत, लवकरच म्हणजे उद्याच आपण अण्णांची भेट घेणार आहोत, असं यानंतर केजरीवाल यांनी जाहीर केलंय.
Dec 11, 2013, 07:38 PM ISTअण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!
अण्णांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत.
Dec 11, 2013, 06:23 PM ISTअरविंद केजरीवालांचं, गरज सरो... वैद्य मरो!
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Dec 11, 2013, 06:07 PM ISTयापूर्वी १६ वेळा एकट्यानंच यशस्वी केली आंदोलनं - अण्णा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.
Dec 10, 2013, 10:37 PM ISTजनलोकपालसाठी अण्णांचं आजपासून बेमुदत उपोषण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत.
Dec 10, 2013, 08:41 AM ISTजनलोकपालसाठी अण्णांचं पुन्हा उपोषणास्त्र!
जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.
Dec 9, 2013, 03:31 PM IST