टीम इंडियाचा कॅप्टन धोनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. धोनीच्या या निर्णयामुळं क्रिकेट जगात खळबळ माजलीय.

Updated: Dec 30, 2014, 07:56 PM IST


धोनीची निवृत्ती बीसीसीआयनं केली जाहीर

मेलबर्न : भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यानं टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि मेलबर्न टेस्टनंतर कॅप्टन कूल माहीनं तडकाफडकी टेस्टमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयामुळं क्रिकेट विश्वात प्रचंड खळबळ उडाली असून, त्याच्या चाहत्यांना अनपेक्षित धक्का बसलाय.

धोनीनं तडकाफडकी हा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळं पुढच्या कसोटीत आता खेळणार नाहीय. ऑस्ट्रेलिया विरुद्धची अखेरच्या टेस्टचा आता विराट कोहली कॅप्टन असेल. 

धोनी आतापर्यंत 90 टेस्ट खेळला असून, 144 इनिंगमध्ये त्यानं 4 हजार 876 धावा केल्या. त्यामध्ये 6 शानदार सेन्चुरीज आणि 33 हाफ सेन्चुरीजचा समावेश आहे.. बॅट्समन म्हणून 224 ही धोनीची सर्वोच्च धावसंख्या आहे.. रांचीसारख्या लहान शहरातून आलेल्या धोनीनं 2 डिसेंबर 2005 रोजी श्रीलंकेविरूद्ध चेन्नईत टेस्ट पदार्पण केलं.. आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत कॅप्टन कूल म्हणून आपली ओळख निर्माण केली. अलिकडेच विकेटकीपर म्हणून धोनीनं स्टंपिंगचा विश्वविक्रम केला होता.. त्यानं आतापर्यंत 134 फलंदाजांना स्टंपिंग करून आऊट केलं असून, क्रिकेटमधील हा नवा विक्रम आहे. टेस्ट मॅचमध्ये त्यानं 38 फलंदाजांना स्टंपिंग आऊट केलं असून, विकेटकीपर म्हणून 256 कॅचेस घेतलेत. 

यानंतर, क्रिकेट जगतात उमटलेल्या या काही प्रतिक्रिया...