पुण्यात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला विरोध, नेमकं कारण काय?

दिलजीत दोसांझ नेहमी त्याच्या कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता त्याच्या पुण्यातील कॉन्सर्टला स्थानिकांचा विरोध होत आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 24, 2024, 06:36 PM IST
पुण्यात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला विरोध, नेमकं कारण काय?  title=

Diljit Dosanjh Pune Concert: प्रसिद्ध सिंगर दिलजीत दोसांझ हा नेहमी त्याच्या कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. मोठ्या प्रमाणात त्याचा सोशल मीडियावर चाहता वर्ग आहे. त्याच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. अशातच आता दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्ट संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टला स्थानिकांनी विरोध केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

दिलजीत दोसांझचा पुण्यात आज संध्याकाळी कोथरुड परिसरामध्ये कॉन्सर्ट होणार आहे. कोथरुडमधील काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होणार आहे. परंतु त्याआधीच तेथील स्थानिक रहिवाशांनी आणि मनसेने या कॉन्सर्टला विरोध केला आहे. ज्यामध्ये दिलजीत दोसांझचा ज्या ठिकाणी हा शो होणार होता. त्याठिकाणी तेथील स्थानिकांनी जाऊन आंदोलन सुरु केलं आहे. 

कोथरुडमधील नागरिकांनी आंदोलन करत 'सेव्ह कोथरुड' म्हणत हा शो होऊ नये अशी मागणी केली आहे. दिलजीत दोसांझच्या या कार्यक्रमातील मद्याचे स्टॉल देखील काढून घेतले आहेत. कारण मद्य विक्रीला इथे परवानगी नसल्याने ते काढून घेतले आहेत. त्यासोबतच तेथील नागरिकांनी या ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी कशी दिली असा देखील सवाल उपस्थित केला आहे. 

कोथरुडमधील दिलजीत दोसांझच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पीकरच्या भिंती उभारल्या जाणार आहेत. त्या 80-100 स्पीकरच्या भिंतीमुळे तिथे राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना त्या आवाजाचा त्रास होईल म्हणून त्यांनी दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाला विरोध केल्याचं म्हटलं जात आहे. 

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना

दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोथरूडमधील भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलजीत दोसांझचा हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.