पाहा: आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी चिमुरड्याचा कुत्र्यासोबत लढा

अहमदाबादमध्ये दीड वर्षाच्या मुलीला तिच्या भावानं कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना समोर आलीय. कशिष धनानी असं या मुलाचं नाव आहे.

Updated: Dec 30, 2014, 02:29 PM IST
पाहा: आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी चिमुरड्याचा कुत्र्यासोबत लढा title=

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये दीड वर्षाच्या मुलीला तिच्या भावानं कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना समोर आलीय. कशिष धनानी असं या मुलाचं नाव आहे.

या दीड वर्षाच्या चिमुकलीवर एका जर्मन शेफ्लड कुत्र्यानं हल्ला केला असता तिचा १० वर्षाचा भाऊ तिला वाचवण्यासाठी पुढं सरसावला आणि त्यांनं आपल्या बहिणीला या भयानक हल्ल्यातून बचावलं.

हा व्हिडिओ म्हणजे तिथलं सीसीटीव्ही फुटेज आहे. कशिश आणि त्याची १५ महिन्याची बहिण कांची अहमदाबादच्या मकबरा इथं अनाहता फ्लॅटमध्ये राहतात. आपल्या सोसायटी खाली बगिच्याच खेळत असतांना तिथं एका कुत्र्यानं कांचीला आपल्या तावडीत घेण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, झी मीडियानं त्यांच्या आईसोबत बातचित केली तेव्हा कळलं की, तब्बल १० मिनिटं कशिश आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी लढत होता. पण समोर इमारतीत बाल्कनीतून लोकं पाहत होते, मदतीला आले नाहीत. तो कुत्रा सोसायटीतील एकाच्या घरचा होता. 

काहीवेळानंतर मुलांची आई, रस्त्यानं जाणारी व्यक्ती आली आणि त्यांनी दोन्ही मुलांना वाचवलं. या संपूर्ण घटनेत कुत्र्यानं अनेक वेळा कांचीवर हल्ला केला. पण तिला काहीही जखम झाली नाहीय. तर तिच्या भावाला थोड्या जखमा झाल्या आहेत. 
 
पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.