24taas

अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jan 20, 2015, 03:38 PM IST

सॅमसंगच्या गॅलेक्सी S3 नियोच्या किमतीत 3,500 रुपयांची कपात

अॅपलच्या आयफोन ५सी आणि आसुसच्या जेनफोनच्या किमतीतील कपातीनंतर आता सॅमसंग इंडियानं सुद्धा आपल्या ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाचं मोठं गिफ्ट दिलंय. सॅमसंगनं गॅलेक्सी एस ३ नियो स्मार्टफोनची किंमत साडे तीन हजार रुपयांनी कमी केलेत. 

Jan 20, 2015, 03:14 PM IST

जगभरातील ९९ टक्के लोकांइतकी संपत्ती १ % श्रीमंतांकडे

जगभरातील ९९ टक्के लोकांइतकी संपत्ती १ % श्रीमंतांकडे 

Jan 20, 2015, 02:40 PM IST

अबब! फक्त नोटा मोजण्यासाठी दरवर्षी २१ हजार कोटींचा चुराडा

आर्थिक व्यवहारांसाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर होऊ शकतो, पावलोपावली एटीएम सेंटर्स, ईसीएस आणि आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सिस्टीम) सारखे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. तरीही भारतीयांचा रोख कॅशनं व्यवहार करण्यावर कायम राहिलेला आहे. तोच आता बँकांना महागात पडत आहे. 

Jan 20, 2015, 12:31 PM IST

आईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग

चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला. 

Jan 20, 2015, 11:57 AM IST

व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.

Jan 20, 2015, 10:54 AM IST

एक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.

Jan 20, 2015, 09:54 AM IST

WhatsApp लवकरच लॉन्च करणार 'WhatsApp Plus'

जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर वेळोवेळी काहीतरी नवं करावं लागतं. बहुतेक हीच बाब ऑनलाइन मॅसेंजर सेवा देणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या ऑपरेचर्सच्या लक्षात आलेली दिसते. 

Jan 20, 2015, 08:43 AM IST

दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

Jan 20, 2015, 08:04 AM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs इंग्लंड (तिसरी वनडे)

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील तिसरी वनडे आज खेळली जातेय. भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाबरोबर पहिलाच सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. 

Jan 20, 2015, 06:46 AM IST

अंतराळात मिळालं घोस्ट पार्टिकल, एलियन्स असल्याचा पुरावा

संशोधकांनी एक महत्त्वाचा शोध लावलाय. संशोधकांनी अंतराळातून मिळालेल्या मलब्यात एका सावलीप्रमाणे 'घोस्ट पार्टिकल' शोधलंय. यामुळं अंतराळात एलियन असल्याची शक्यता वाढलेली आहे.

Jan 19, 2015, 04:08 PM IST

पेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार

देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत. 

Jan 19, 2015, 03:37 PM IST

आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचं वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत. 

Jan 19, 2015, 02:58 PM IST

तालिबाननं केली ब्रिटनीच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स बॉयफ्रेंड जॉन सुंडेलचा अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ४४ वर्षीय जॉन पायलट होते आणि अफगानिस्तानात खाजगी क्रॉन्ट्रॅक्टवर काम करत होते.

Jan 19, 2015, 02:19 PM IST