किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.

Updated: Jan 15, 2015, 06:09 PM IST
किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश! title=

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.

अशातच माजी आयपीएस अधिकारी आणि अण्णा हजारेंच्या सहकारी किरण बेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. किरण बेदी यावेळी उपस्थित होत्या. किरण बेदींचं पक्षात येणं भाजपसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी सपा नेत्या जया प्रदा आणि आपच्या माजी नेत्या शाजिया इल्मी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जाणकार तर असंही सांगतायेत की, किरण बेदीला भाजप अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून निवडणूक रिंगणात उतरवू शकतात. किरण बेदी यांना भाजप दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणूनही प्रोजेक्ट करू शकतात, असा अंदाज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.