24taas

क्रिकेटपटूच्या छातीवर आदळला बॉल, हार्ट अॅटॅकने मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात आणखी एक दु:खद घटना घडलीय. १८ वर्षीय जीशान मोहम्मदच्या छातीवर बॉल लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. 

Jan 26, 2015, 09:44 PM IST

पाहा :PM च्या सुटवर PM चं नाव!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही केलं तर चर्चा तर होणारच... मग आपल्या भाषणांमधून इतिहासाची माहिती देणं असो किंवा सतत बदलणारे कपडे. देशाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात आलेत. मात्र तिथंही चर्चा आहे ती मोदींच्या खास सुटची... 

Jan 26, 2015, 08:57 PM IST

बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Jan 26, 2015, 08:21 PM IST

व्यंगचित्रांच्या बादशहाची एक्झिट: संपूर्ण कारकीर्द

विख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक आर. के. लक्ष्मण  यांच्या मृत्यूनं व्यंगचित्रकलेतला 'अनकॉमन मॅन' हरपला आहे. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅननं सहा दशकांपेत्रा जास्त काळ हसता हसता आपल्याला अंतर्मुख केलं. 

Jan 26, 2015, 07:50 PM IST

अन'कॉमन मॅन' हरपला! आर. के. लक्ष्मण यांचं निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jan 26, 2015, 07:19 PM IST

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट

देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

Jan 26, 2015, 06:51 PM IST

कबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय.  अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.

Jan 26, 2015, 05:57 PM IST

एका वर्षाच्या फ्री इंटरनेटसोबत स्मार्टफोन लॉन्च करणार डाटाविंड

कमी किमतीचे मोबाईल उपकरण बनवणारी कंपनी डाटाविंड लवकरच एक असा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्यात तब्बल एक वर्ष फ्रीमध्ये इंटरनेट उपलब्ध असेल.

Jan 26, 2015, 05:49 PM IST