पाहा :PM च्या सुटवर PM चं नाव!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही केलं तर चर्चा तर होणारच... मग आपल्या भाषणांमधून इतिहासाची माहिती देणं असो किंवा सतत बदलणारे कपडे. देशाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात आलेत. मात्र तिथंही चर्चा आहे ती मोदींच्या खास सुटची... 

Updated: Jan 26, 2015, 08:57 PM IST
पाहा :PM च्या सुटवर PM चं नाव! title=

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही केलं तर चर्चा तर होणारच... मग आपल्या भाषणांमधून इतिहासाची माहिती देणं असो किंवा सतत बदलणारे कपडे. देशाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात आलेत. मात्र तिथंही चर्चा आहे ती मोदींच्या खास सुटची... 

पंतप्रधान मोदींनी घातलेला हा सुट विशेष होता. याचं वैशिष्ट्य डिझाइन किंवा रंग नाही तर त्यावर चक्क मोदींचं नाव होतं. या सुटवर पिवळ्या रंगात जी डिझाइन सारखी वाटली ती पट्टी म्हणजे 'नरेंद्र दामोदरदास मोदी' हे नाव कोरलेली पट्टी होती. संपूर्ण सुटवर हजारोंवेळा मोदींचं नाव लिहिलेलं होतं. 

दुरून पाहिलं तर ही कपड्याची डिझाईन वाटत होती. मात्र जवळून पाहिल्यास मोदींचं नाव त्यावर स्पष्ट दिसून येत होतं. मोदींचा हा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर खूप शेअर केला जातोय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या एका शुभचिंतकानं हा सुटचा कपडा त्यांना भेट म्हणून दिला होता. त्यानंतर आपल्या टेलरकडून त्यांनी तो शिवून घेतला.

मोदी जगातील पहिले असे नेते नाहीयेत, ज्यांचं नाव सुटवर आहे. इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक हे सुद्धा अशाप्रकारचे सुट घालायचे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.