मुंबई: मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय. अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.
महापालिकेच्या अहवालातच याचा खुलासा झालाय. या अहवालानुसार कबुतरांच्या विष्ठेमध्ये आढळणाऱ्या जंतूंमुळं अस्थमाची लागण होऊ शकते. के माहीम, काळाचौकी , वरळी , दादरसारख्या भागांमध्ये कबुतरांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना कबुतरांमुळं दमा झाल्याचं समोर आलंय.
दमा टाळायचा असेल तर कबुतरांना रोखायला हवं. त्यासाठी लोकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच सरकारी यंत्रणांनीही कबुतरांपासून होणारा दमा रोखण्यासाठी विशेष उपाय आखायलात हवेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.