अन'कॉमन मॅन' हरपला! आर. के. लक्ष्मण यांचं निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated: Jan 26, 2015, 10:34 PM IST
अन'कॉमन मॅन' हरपला! आर. के. लक्ष्मण यांचं निधन title=

पुणे: ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये उद्या सकाळी मंगळवारी आर.के. लक्ष्मण यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांना फुप्फुस आणि किडनीचाही त्रास होता. तर २०१० मध्ये पक्षाघातही झाला होता. आर. के. लक्ष्मण यांच्या निधनानं अन 'कॉमन मॅन' हरपला अशी भावना व्यक्त होतेय.

'कॉमन मॅन' व्यंगचित्राला जन्म देणारे व्यंगचित्रकार म्हणून आर के लक्ष्मण यांची देशभर ओळख आहे. लक्ष्मण यांचं ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशकं चर्चेत राहिलं. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने, जनतेनेही ते उचलून धरलं.
 
१९५० पासून सुरू केलेली कार्टून कला गेल्या काही वर्षांपर्यंत सुरूच होती. गेल्या काही दिवसांपर्यंत त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. मात्र प्रकृती खालावल्यामुळं त्यांचा कुंचला काही दिवसांपासून चालला नाही आणि आज तो अखेरचा थांबला.

आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण प्रत्येक घरात पोहोचले होते. त्यांचा कॉमन मॅन सर्वांमध्येच होता. झी मी़डियाकडून आर. के. लक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.