बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Updated: Jan 26, 2015, 10:13 PM IST
बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही  title=

मुंबई: महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी राष्ट्रपती भवनात ओबामांसाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हे निमंत्रणच पोहचवलं नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची ओबामांशी भेट टळली. 

या प्रकारामुळं संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढलीय. तसंच या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.