पुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना

पुढल्या वर्षीपासून शासकीय शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी केली जावी अशी मागणी शिवसेनेनं केलीये. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलीये. आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तशी मागणी केल्याचं ते म्हणाले. 

Updated: Feb 19, 2015, 12:59 PM IST
पुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना title=

मुंबई: पुढल्या वर्षीपासून शासकीय शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी केली जावी अशी मागणी शिवसेनेनं केलीये. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलीये. आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तशी मागणी केल्याचं ते म्हणाले. 

शिवजयंतीची सुट्टीदेखील तिथीनुसारच द्यावी अशीही त्यांची मागणी आहे. आज शिवजयंतीनिमित्त महापौर बंगल्यावर कार्यक्रम झाला. यावेळी शिवाजी पार्कातल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. 

पालकमंत्री या नात्यानं प्रोटोकॉल म्हणून या कार्यक्रमाला हजर राहिलो. मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर शिवसेना ठाम असल्याचं देसाई म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, महापौर स्नेहल आंबेकर, परीवहन मंत्री दिवाकर रावते, महापालिका आयुक्त सिताराम कुंटे आदी उपस्थित होते. 

पुढच्या वर्षी तिथीप्रमाणे शासकीय शिवजयंती उत्सव होईल आणि सुट्टीही असेल याबाबत शिवसेना प्रयत्नशील आहे, असं सुभाष देसाईंनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.