'UAE'चा विकेट किपर पालघरचा मराठमोळा स्वप्नील पाटील

आज वर्ल्डकपमध्ये मॅच आहे ती यूएई आणि झिम्बाब्वेच्या टीममध्ये. याच यूएई म्हणजे संयुक्त अरब अमितातच्या टीमचा विकेट किपर आहे मराठमोळा स्वप्नील पाटील. स्वप्नील मूळचा पालघरचा आहे.

Updated: Feb 19, 2015, 10:30 AM IST
'UAE'चा विकेट किपर पालघरचा मराठमोळा स्वप्नील पाटील title=

मुंबई : आज वर्ल्डकपमध्ये मॅच आहे ती यूएई आणि झिम्बाब्वेच्या टीममध्ये. याच यूएई म्हणजे संयुक्त अरब अमितातच्या टीमचा विकेट किपर आहे मराठमोळा स्वप्नील पाटील. स्वप्नील मूळचा पालघरचा आहे.

स्वप्नीलनं आजच्या मॅचमध्ये ३२ रन्स केलेत. सिन विलियम्सच्या बॉलवर स्वप्नील कॅचआऊट झाला. पालघर जिल्ह्यातल्या दरपाळे गावातल्या स्वप्नीलला २००६मध्ये दुबईच्या योगी ग्रृप क्रिकेट क्लबनं संधी दिली. तिथून त्याला मोठी संधी मिळाली. २०१० साली स्वप्नीलची यूएईच्या टीममध्ये निवड झाली आणि आता तो आतंरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकप २०१५मध्ये खेळतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक भारतीय वंशाचे खेळाडू इतर टीमकडून खेळतांना दिसतात. पण स्वप्नील मराठमोळा आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही स्वप्नीलला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.