भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Updated: Feb 20, 2015, 11:39 AM IST
भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू title=

मुंबई: भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे ज्या कंपनीचे मालक होते, त्याच कंपनीला महाराष्ट्र सदनाच्या कामाचं कंत्राट दिल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.  

तसंच महाराष्ट्र सदनासाठी घेण्यात आलेल्या वस्तूंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलाय असा संशय आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायनं दिलेल्या आदेशानुसार छगन भूजबळ आणि समीर भूजबळ यांची चौकशी केली जाणार आहे. या आधी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ४ जणांची चौकशी करण्यात आली होती ज्यात दोन ठेकेदार, एक अधिकारी आणि भूजबळ परीवाराच्या अगदी जवळच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. 

दरम्यान, ही चौकशी पूर्ण करुन येत्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.