...तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जवखेडाला अचानक भेट दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना गाफील ठेवून त्यांनी हा दौरा केला. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतानाच वेळ पडल्यास तपासाची सूत्रं CBIकडे दिली जातील, असं ते यावेळी म्हणाले.  

Updated: Nov 30, 2014, 03:17 PM IST
...तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री title=

जवखेडा, अहमदनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जवखेडाला अचानक भेट दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना गाफील ठेवून त्यांनी हा दौरा केला. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतानाच वेळ पडल्यास तपासाची सूत्रं CBIकडे दिली जातील, असं ते यावेळी म्हणाले.  

मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या फडणवीसांच्या कार्यक्रमपत्रिकेत जवखेड्याचा दौऱ्याचा उल्लेख नव्हता. हत्याकांडाला दीड महिना उलटल्यानंतरही आरोपी सापडत नसताना आज अखेर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला ४० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी चार जणांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असली तरी या चौघांनी कोर्टात धाव घेत नार्को टेस्टला विरोध केला आहे. कोर्टानंही या चौघांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी नाकारली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.