'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड

टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

Updated: Jan 5, 2015, 04:31 PM IST
'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड title=

मुंबई : टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

एकाचवेळी मुंबई, पुणे या शहरांसह २१ ठिकाणी सीबीआयने ठापे टाकले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने सतीश शेट्टी हत्येचा तपास पुन्हा सीबीआयला देण्याचे आदेश केले आहेत.

सीबीआयने आयआरबी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह विविध संचालकांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत.

सतीश शेट्टी हत्या प्रकरण
आरटीआय कार्यकर्ते  सतीश यांनी आयआरबीवर आपली जमीन बळकावल्याचा आरोप केला होता, हे प्रकरण २००९-२०१० मधील आहे, सतीश शेट्टी यांची जमीन मुंबई-पुणे हायवेला लागून होती. यानंतर सतीश शेट्टी यांची तळेगावात हत्या झाली होती, या प्रकरणी सीबीआयला आयआरबी कंपनीवर संशय आहे.

सतीश शेट्टी हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू होती, मात्र शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला, शेट्टी कुटुंबियांनी या रिपोर्टला उच्च न्यायालयात आव्हान दिलं, यानंतर मात्र उच्च न्यायालयाने पुन्हा सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.