सानिया मिर्झा

सानिया आणि माझे नाते मजबूतः मलिक

कराचीः पाकिस्तानचा ऑलराउंडर शोएब मलिक आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या फाटल्याची बातमी आल्यानंतर आता शोएब मलिकने पहिल्यांदा यावर समोर येऊन आमचे वैवाहिक जीवन सुखमय असल्याचे आणि दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

Dec 19, 2014, 08:41 PM IST

सानिया आणि शोएबमध्ये बिनसलं...

 भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या प्रकरणावर दोघांपैकी कोणीही काहीही बोललं नाही. पण जेव्हा शोएब मलिक याने आपल्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानची अभिनेत्री हुमैमा मलिक आणि त्याच्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला. 

Dec 11, 2014, 09:05 PM IST

या देशात सानिया मिर्झा होणे पाप आहे - सानिया

भारतातील सर्वात चर्चेत खेळाडू पैकी एक टेनिसपटू सानिया मिर्झा. सानियाने 'लिंग असमानता' च्या कारणावरून 'या देशात सानिया मिर्झा होणे मुश्किल आहे', असे सानियाने म्हटले आहे.

Nov 26, 2014, 02:18 PM IST

सलमान खानच होऊ शकेल माझा पती : सानिया मिर्झा

भारताची लाडकी टेनिसस्टार सानिया मिर्झा म्हणते की सलमान खानच माझा पती होऊ शकतो. इतकं आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये, कारण सानिया मिर्झाला सलमान खान हा तिच्या खऱ्या आयुष्यात पती म्हणून नकोय तर तिच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात हवाय.

Nov 24, 2014, 08:07 PM IST

सानिया मिर्झा - कॅरा ब्लॅकनं जिंकली WTA डबल्स चॅम्पियनशीप

डब्ल्यूटीए स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकनं दिमाखदार विजय मिळवून विश्वविजेतेपदक पटकावलं आहे. मिर्झा आणि ब्लॅक या जोडीनं तैपेईच्या सू वेई सेह आणि चीनच्या शूई पेंग यांचा ६-१, ६-० असा पराभव केला.

Oct 26, 2014, 04:56 PM IST

सानिया मिर्झाला ताज महालमध्ये नो एंट्री

आग्राः मंगळवारी संध्याकाळी सानिया मिर्झा ही ताज महल पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला ताज महालमध्ये जाऊ दिले नाही.

कारण ताज महाल पाहण्याची वेळ संपली होती. तेव्हा महालचे दरवाजे देखील बंद झाले होते. त्यामुळे तिला आत जाण्यास मनाई केली होती.

Oct 8, 2014, 05:42 PM IST

सानिया मिर्झा- साकेत मायनेनी जोडीला गोल्ड मेडल!

भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली. 

Sep 29, 2014, 09:46 PM IST

सानियानं घेतली नरेंद्र मोदींची भेट!

सानियानं घेतली नरेंद्र मोदींची भेट!

Sep 13, 2014, 10:40 AM IST

सानियानं घेतली नरेंद्र मोदींची भेट!

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिनं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

Sep 13, 2014, 10:09 AM IST

यूएस ओपन टेनिसचे सानिया- ब्रुनोला जेतेपद

भारताची सानिया मिर्झा आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले. 

Sep 6, 2014, 07:24 AM IST

...जेव्हा सानियाला चेहरा झाकून पडावं लागतं बाहेर!

 

हैदराबाद :  सानिया मिर्झानं टेनिस खेळून जरी देशाचं नाव उंचावल असलं तरी रात्री बाहेर पडताना तिला आपला चेहरा झाकून बाहेर पडण्याची गरज भासतेय.

सानियानं फेसबुकवर आपला एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत तिनं स्वतःचा चेहरा मोठ्या नजाकतीनं झाकलेला दिसतोय.... या फोटोसोबत आपला चेहरा का लपवून ठेवावा लागतोय, याचं कारणंही सानियानं तिच्या फॅन्सना सांगितलंय. 

Jul 30, 2014, 05:31 PM IST