यूएस ओपन टेनिसचे सानिया- ब्रुनोला जेतेपद

भारताची सानिया मिर्झा आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले. 

Updated: Sep 6, 2014, 07:25 AM IST
यूएस ओपन टेनिसचे सानिया- ब्रुनोला जेतेपद title=

न्यूयॉर्क : भारताची सानिया मिर्झा आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले.

या जोडीने अंतिम लढतीत अबिगाइल स्पेअर्स आणि सँटिआगो गोन्झालेझ जोडीवर ६-१, २-६, ११-९ असा विजय मिळवला. सानियाला महिला दुहेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. 

मार्टिना हिंगीस आणि फ्लॅव्हिआ पेनेट्टा जोडीने भारताच्या सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅक या जोडीवर ६-२, ६-४ असा विजय मिळवला. स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.