नवी दिल्ली : भारतातील सर्वात चर्चेत खेळाडू पैकी एक टेनिसपटू सानिया मिर्झा. सानियाने 'लिंग असमानता' च्या कारणावरून 'या देशात सानिया मिर्झा होणे मुश्किल आहे', असे सानियाने म्हटले आहे.
सानियाने महिला खेळाडू असल्याने आपल्या करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे. सानियाने सांगितले, सानिया मिर्झा होणे कठिण आहे. माझे म्हणणे असे आहे की, मला करिअरमध्ये अधिकवेळा वादाचा सामना करावा लागला. कारण मी एक महिला आहे. मात्र, मी पुरुष असते तर मला काही अडचणी आल्या नसल्या आणि मला त्याला तोंड द्यावे लागले नसते.
सानियाला दक्षिण आशिया विभागासाठी संयुक्त राष्ट्र सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघात महिला आणि मुली यांच्याविरोधात हिंसेबाबत घटना दूर करण्याचे अभियान चालविले जाते. तसेच लिंग समानता जनजागृती केली जाते. सानिया ही दक्षिण आशिया विभागासाठी पहिली महिला संयुक्त राष्ट्र महिला इतिहासात सद्भावना दूत म्हणून पहिल्यांदाच निवडण्यात आली आहे.
माझे सांगणे आहे की, भारतातील महिलांनी जास्त करुन खेळामध्ये सहभागी झाले पाहिजे. यासाठी आपल्या संस्कृतीत बदल केला पाहिजे. सरकार यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अनेक बदल होतील, अशी मला अपेक्षा आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, सरकार समाजात लिंग असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही बाब किती महत्वाची आहे, हे यावरून दिसून येते.
लिंग समानताबाबत आपण सर्वांनी समर्थन केले पाहिजे. याबाबत कोणीही बोलत नाही. मला यासाठीच नियुक्त कऱण्यात आले आहे. मला आशा आहे की, एक दिवस सर्वजण याविषयावर बोलतील. महिलांसोबत एक वस्तू म्हणून व्यवहार करु नये. मी हा बदल करण्यासाठी माझ्यापरिणे प्रयत्न करीन.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.