नवी दिल्ली : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिनं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
यूएस ओपन टेनिसच्या मिक्स डबल्स जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून सानियाचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर, सानियानं मोदींची प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सानियानं पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सानिया तिची आई नसीमा मिर्झा यांच्यासोबत होती.
यावेळी, ‘पंतप्रधानांनी तुझा देशाला अभिमान वाटतो’, अशा शब्दांत सानियाचं कौतुक केलं. ब्राझीलच्या ब्रुनो सोअर्ससह सानियानं युएस ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. सानिया मिर्झाच्या यशाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनीही तिचं अभिनंदन केलंय. पंतप्रधानांना भेटण्याआधी तिनं राष्ट्रपतींचीही भेट घेतली.
तर, बुधवारी सानियानं हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. सानिया या नव्या राज्यात ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
गेल्या शुक्रवारी सानियानं ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससोबत मिळून करिअरमधला तिसरा ‘मिक्स्ड डबल ग्रँडस्लॅम’ आपल्या नावावर केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.