सानिया आणि शोएबमध्ये बिनसलं...

 भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या प्रकरणावर दोघांपैकी कोणीही काहीही बोललं नाही. पण जेव्हा शोएब मलिक याने आपल्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानची अभिनेत्री हुमैमा मलिक आणि त्याच्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला. 

Updated: Dec 11, 2014, 09:05 PM IST
सानिया आणि शोएबमध्ये बिनसलं... title=

हैदराबाद :  भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या प्रकरणावर दोघांपैकी कोणीही काहीही बोललं नाही. पण जेव्हा शोएब मलिक याने आपल्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानची अभिनेत्री हुमैमा मलिक आणि त्याच्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला. 

शोएबने ट्वीट केला की, 'स्वीट आणि गॉर्जियस मैत्रिण हुमैमा मलिक आणि तिच्या कुटुंबियासोबत डिनर केला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. हुमैमा हिनेही आपल्या ट्विटर अकाउंटवर एक सेल्फी पोस्ट केला. यात शोएबही दिसत होता. यानंतर या दोघांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या. 

तसेच सानिया टीव्ही शोमध्ये पुरूषांना महिलांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग सांगतले पण तिच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नाही. सानिया आज काल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजतेने देते. पण वैवाहिक जीवनाबद्दल काही विचारले तर ती तो प्रश्न टाळताना दिसते. 

सानिया जेव्हा रॉजर फेडरर, रोहन बोपन्ना, महेश भूपती, रितेश देशमुख आणि इतरांसह दिल्लीत व्यस्त होती, तेव्हा शोएब हुमैमासोबत कराचीत पार्टी करत होता. 

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांच्या नात्यांमध्ये बिनसल्याच्या बातम्या आल्यानंतर सानियाचे वडिल इमरान मिर्झा यांनी खुलासा करून सर्व काही ठीकठाक असल्याचे सांगितले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.