सराफा बाजार

सोने पुन्हा एकदा २९ हजार पार

सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले. 

Mar 16, 2017, 05:42 PM IST

सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

Feb 10, 2017, 04:11 PM IST

सोन्याचे दर ५० रुपयांनी स्वस्त, चांदी महागली

सोन्याच्या दरात शनिवारीही घसरण सुरु होती. सोन्याच्या विक्रीत आलेली घट यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांची घट झाली. 

Dec 25, 2016, 10:23 AM IST

धनत्रयोदशीच्या निमित्तानं सराफा बाजार उत्साहात

धनत्रयोदशीला सोनं खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी सोनं घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा करायची, अशी प्रथा आहे. 

Oct 28, 2016, 07:19 PM IST

सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

Nov 9, 2015, 11:14 AM IST

... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं

पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

Sep 13, 2015, 04:53 PM IST

सोनं २५ हजारांच्याही खाली घसरलं... गेल्या चार वर्षांतला निच्चांक

स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.

Aug 7, 2015, 12:43 PM IST

'सोनं घसरून पुढील 30 दिवसांत येणार 23 हजारांवर'

सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.

Jul 27, 2015, 05:13 PM IST

सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Nov 30, 2014, 10:33 AM IST

खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!

तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

Nov 5, 2014, 09:21 AM IST

सोनं, चांदी आणखी घसरलं

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.

May 28, 2014, 06:14 PM IST

सोन्यानं गाठली बत्तीशी!

एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्यानं मात्र बत्तीशी गाठलीय. सोन्यानं रेकॉर्ड करत ३२ हजार ५२६ एवढा भाव खाल्लाय.

Aug 27, 2013, 01:11 PM IST

सोनं स्वस्त, खरेदीदारांची चांदी!

थंडावलेला जागतिक बाजार आणि स्थानिक बाजारातही मागणी नाही... यामुळे सराफा बाजार मात्र काळजीत पडलेत. सोन्याचा दर आणखी कमी झालाय.

Jun 26, 2013, 08:34 AM IST