... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं

पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

Updated: Sep 13, 2015, 04:53 PM IST
... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं title=

नवी दिल्ली/जयपूर: पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

अधिक वाचा - सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...

तज्ज्ञांच्या मते असं झाल्यास घरगुती बाजारात सोनं २००० रुपये प्रति १० ग्रामवर येईल. फेडच्या बैठकीशिवाय यंदा कमी पडलेला पाऊस, आयात ड्यूटीत कपात, गोल्ड मोनेटायझेन स्कीम आणि चीनमधून कमी झालेली मागणी सोन्याच्या किमतीवर परिणाम करू शकतात. शनिवारी जयपूरच्या सराफा बाजारात सोनं १५० रुपयांनी कमी होत २६,२०० रुपये प्रति १० ग्रामवर आलं. 

अधिक वाचा - सराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर

डॉलर इंडेक्स ९६ अंकांच्या जवळ पोहोचलेत. अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकड्यांमुळे डॉलरमध्ये तेजी पाहायला मिळतेय. पॅराडाइम कमोडिटीचे सीईओ बिरेन वकील यांनी सांगितलं की, मागील एका वर्षात डॉलर इंडेक्समध्ये १४ टक्क्यांनी अधिक वाढ आहे. वकील यांच्या मते, अमेरिकेत व्याजदर वाढले, तर डॉलर इंडेक्स १०० अंकांच्या पार पोहोचू शकतो, म्हणून सोन्याच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.