Nashik boy fell Down: तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष केले तर कधी कोणती गोष्ट महागात पडेल? हे सांगता येणार नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देते. 2 वर्षांचा चिमुरडा बाल्कनीतून थेट खाली पडला. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय
2 वर्षांचा चिमुकला करिम शेख सकाळी 9 वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. त्यानंतर अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला. समोरच्या घरातील व्यक्ती बाहेर आली. त्यावेळी मुलगा खाली पडल्याचे त्यांनी पाहिले. यात तो गंभीर जखमी झालाय.
करिम खाली पडल्याचे समजताच तात्काळ शेजारी गोळा झाले. त्यांनी मुलाच्या कुटुंबियांना कळवले. यानंतर त्या मुलाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
करिम गॅलरीतून खाली पडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. काळे मळा येथे सिडकोत योजनेतील इमारतीमध्ये शेख कुटुंबीय राहते. शुक्रवारी सकाळीच्या सुमारास करीम हा खेळत होता. त्यावेळी करिमची आई कपडे धुत होती. करिम गॅलरीत खेळता खेळता रिलॉगवर पकडून उभा राहिला होता.
त्यानंतर अचनाक करिमचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्याहून थेट खाली पडला. शेख यांच्या घरासमोर राहणाऱ्या कुटुंबाच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी करिमला तात्काळा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
सध्या करिमवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.