www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.
सोन्यासोबतच चांदीच्याही दरात घसरण झालेली आहे. चांदीचे दर 50 रुपयांनी कमी होत 41 हजार 400 रुपये प्रति किलो झाला. मागील दोन महिन्यांमध्ये चांदीची किंमत 250 रुपयांनी घसरलीय.
सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याची किंमत घसरुन 1285.50 डॉलर प्रति पाऊंड झाली. चांदी सुद्धा कमी होऊन 19.31 डॉलर प्रति पाऊंडवर पोहोचला. याचा परिणाम घरगुती बाजारावर पडलाय. जिथं आधीच दागिन्यांचे निर्माते आणि किरकोळ ग्राहकांची मागणी खूप कमी झालेली आहे. तिथं सोन्याचा भाव 170 रुपयांनी कमी झाल्यानं भाव 27 हजार 900 रुपये प्रति 10 ग्राम इतका झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.