नवी दिल्ली : स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.
बुधवारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीच्या किंमती ढासळल्यानं नवी दिल्ली सराफा बाजारात सोन्यानं ११० रुपयांची घसरण घेऊन २५,०२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर दाखल झालं होतं. तर चांदीचेही भाव ५० रुपयांनी घसरून जवळपास पाच वर्षांच्या न्यूनतम पातळीवर दाखल झाले होते. चांदी ३३,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन ठेपली होती.
६ ऑगस्ट २०११ नंतर सोन्याची ही सर्वात मोठी घसरण आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, डॉलर मजबूत झाल्यानं, तसंच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे सोन्या - चांदीच्या किंमती ढासळताना दिसत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.