विकास भदाणे, जळगाव : धनत्रयोदशीला सोनं खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी सोनं घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा करायची, अशी प्रथा आहे.
सोनं खरेदीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात या निमित्तानं प्रचंड गर्दी होते. सोन्या-चांदीचे शिक्के, लक्ष्मी सरस्वती तसंच गणपतीचे सोन्याचे शिक्के, दागिने, सोन्याची वळी यांना मोठी मागणी असते.
धनत्रयोदशी या सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. त्यामुळे सराफही सोन्याचा तुकडा, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के आणि दागिने तयार ठेवतात.
यंदा पाऊसही चांगला झाल्यानं शेतकरी आनंदात आहे. तो उत्साह सराफा बाजारातही दिसतोय. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याचा भाव जास्त असला तरी सोने खरेदीचा उत्साह गेल्या वर्षीपेक्षा भरपूर आहे.