सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Updated: Nov 30, 2014, 10:33 AM IST
सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण title=

नवी दिल्ली: मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

बाजार जाणकारांनी सांगितलं की, जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची मागणीत घट झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या दरातील घसरणीचा जागतिक सराफ्यावर परिणाम झाला.

सिंगापूर इथं सोन्याचा भाव ०.९ टक्क्यांनी घटून ११८१.८४ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव १.२ टक्क्यांच्या घसरणीसह १६.०५ डॉलर प्रतिऔंस झाला. ही गेल्या २० नोव्हेंबर रोजीची नीचांकी पातळी आहे. गुंतवणूक समभाग बाजारात वळती झाल्यानं सराफा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. 

दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १० रुपयांनी घटून अनुक्रमे २६,६७० रुपये आणि २६,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या तीन दिवसांत १५० रुपयांची घट झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १० रुपयांनी कमी होऊन २३,७०० रुपये झाला. तयार चांदीचा भाव ५५० रुपयांच्या घसरणीसह ३६,२०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४५० रुपयांनी घटून ३५,६१० रुपये प्रतिकिलो राहिला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.