www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्यानं मात्र बत्तीशी गाठलीय. सोन्यानं रेकॉर्ड करत ३२ हजार ५२६ एवढा भाव खाल्लाय.
आता १० ग्रामसाठी तुम्हाला ३२ हजार ५२६ रुपये मोजावे लागणार आहेत. २८ जूनला २५ हजार १३० पर्यंत कमी झालेला सोन्याचा दर पुन्हा २६ टक्क्यांनी वाढलाय. त्यामुळं सराफा बाजारात सोनं विकणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसतेय.
आयातदारांकडून अमेरिकी डॉलरला मोठी मागणी आणि परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून देशातून काढून घेतलं जाणारं भांडवल, यामुळं रुपयाचे मूल्य आज सकाळी पुन्हा घसरलं. अमेरिकी डॉलरचं बळ वाढत चालल्यानं, रुपयाचं मूल्य ६५च्या पुढं जावून ते ६५.७० रुपये एवढं झालंय. त्यामुळं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ५०० अंशांची घसरण पहायला मिळाली. त्याचाच परिणाम की काय सोन्याचा भाव मात्र गगनाला भिडतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.