ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ड्रेसमुळे ट्रोल, 42000 रुपयांच्या ड्रेसची का केली जातेय थट्टा?

ऋषी सुनक यांनी पराभवानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा झाला. राजीनाम्याच्या भाषणावेळी मागे उभ्या असलेल्या अक्षता मूर्ती ट्रोल झाल्या. या ट्रोलिंग मागचे कारण ठरले त्यांचा ड्रेस. या ड्रेसच्या किंमतीसोबत आणखी एक कारण ठरलं महत्त्वाचं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 6, 2024, 02:37 PM IST
ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ड्रेसमुळे ट्रोल, 42000 रुपयांच्या ड्रेसची का केली जातेय थट्टा? title=

ब्रिटनच्या निवडणुकी दरम्यान कंझर्व्हैटिव पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. या दरम्यान त्यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीट बाहेर पंतप्रधान म्हणून अखेरचे संबोधित केले. यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पत्नी अक्षता मूर्ती चांगल्याच ट्रोल झाल्या. अक्षता मूर्ती यांनी यावेळी परिधान केलेला ड्रेस हा भारलीत रुपयांप्रमाणे 42 हजारांचा आहे. हा ड्रेस अक्षता मूर्ती यांच्यासाठी ट्रोलिंगचा विषय ठरला आहे. 

असं काय आहे या ड्रेसमध्ये 

इन्फोसिस फाऊंडर नारायण मूर्ती यांची मुलगी आणि ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना हाय नेकवाला ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ब्रिटनच्या राष्ट्रीय ध्वजात असलेल्या सर्व रंगाचा समावेश आहे. निळा, लाल आणि सफेद रंगाच्या स्ट्रिप असलेला असा हा ड्रेस आहे. पण या ड्रेसमुळे अक्षता मूर्ती यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. 

ट्रोलर्स काय म्हणतात 

इंटरनेट युझर्स या ड्रेसच्या डिझाइनला कंझर्व्हैटिव पार्टी 2024 च्या निकालाचे प्रतिक असल्याचे म्हणत आहे. इंटरनेट युझर्सने या डिझाइनचे वर्णन कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 2024 च्या निवडणुकीच्या निकालांचे प्रतीक म्हणून करण्यास सुरुवात केली. जेम्स नावाच्या युजरने लिहिले की, 'सनकच्या पत्नीने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत टोरीचे मत दर्शविणारा ड्रेस घातला आहे.' एका युझरने लिहिले की, सुनक यांनी अमेरिकन ध्वजाच्या रंगाचा फोटो शेअर केला आहे. 

 

ड्रेसची किंमत किती?

ब्रिटिश न्यूज आउटलेट द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, अक्षरा मूर्तीचा ड्रेस भारतीय फॅशन ब्रँड का-शाचा आहे. रिपोर्टमध्ये या ड्रेसची किंमत 42,000 रुपये आहे. हा कॉटन ड्रेस ऑनलाइन बुटीक ओमी ना ना द्वारे विकला जातो, जो टिकाऊ फॅशन ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षरा मूर्ती चांगले डिझायनर कपडे घालण्यासाठी ओळखली जाते. 2023 मध्ये ब्रिटनच्या टॅटलर मासिकाच्या सर्वोत्कृष्ट पोशाखाच्या यादीत तिने अव्वल स्थान पटकावले.