सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

Updated: Nov 9, 2015, 11:14 AM IST
सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...   title=

मुंबई: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

आणखी वाचा - सोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...

दसऱ्यात चढ्या भावामुळं ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर २० ते २५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता सराफा संघटनेनं व्यक्त केली आहे. दसऱ्याला प्रतितोळा २७ हजारांचा टप्पा ओलांडलेलं सोनं ऐन दिवाळीत अपेक्षेप्रमाणे २६ हजारांखाली उतरलंय.  

दसऱ्याला थांबलेले ग्राहक दिवाळीआधी खरेदीसाठी गर्दी करत असल्याची शक्यता जास्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला सोन्याचा दर प्रति तोळा २७ हजार ४०० इतका होता. त्यामुळं ग्राहकांनीही खरेदीला हात आखडता घेतला. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर गेल्या चार वर्षांत सोन्याचा दर कधीच २७ हजार रुपयांखाली गेला नव्हता. मात्र यंदा २५ हजार ५०० रुपयांपर्यंत उतरलेलं सोनं ग्राहकांसाठी पर्वणी घेऊन आलंय. 

आज धनत्रयोदशीसोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळं गुरूवारी पाडव्यालाही सोनं खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे.  

आणखी वाचा - शुद्ध सोने आणि त्याची गुणवत्ता तपासण्याचे तीन सोपे मार्ग

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.