संजय निरुपम

'...तर निरुपम स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत'

संजय निरुपण यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसेला मात्र झिणझिण्या आल्यात. 'दादरमध्ये येऊन जर त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना हात जरी लावला तर ते परत जाताना स्वत:च्या पायाने चालत जाऊ शकणार नाहीत. बोलणं आणि करणं यात फरक असतो. कार्यकर्त्यांच्या बळावर हे करावं लागतं, काँग्रेसकडं नेते अधिक आहेत, परंतु कार्यकर्त्यांची वाणवा असल्यामुळं त्यांनी अशी भाषा वापरू नये' असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिलंय

Jul 15, 2015, 04:51 PM IST

'निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या'

मुंबईतल्या फेरीवाल्यांवरील कारवाईवरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेत जोरदार जुंपणार असल्याचं दिसतंय. 

Jul 15, 2015, 01:58 PM IST

राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केलाय. 

Mar 2, 2015, 07:51 PM IST

काँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.

Jun 8, 2014, 12:32 PM IST

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

Apr 2, 2014, 12:57 PM IST

भाजप तुपाशी, उद्धव - राज उपाशी : निरुपम

भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यादरम्यान सध्या सुरु असलेल्या सत्तेच्या जोड-तोडीमध्ये आता काँग्रेसनंही तोंड खुपसलंय.

Mar 13, 2014, 12:28 PM IST

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

Jan 26, 2014, 02:08 PM IST

वीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा

मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.

Jan 13, 2014, 10:07 AM IST

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

Jan 1, 2014, 07:34 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याची मागणी अपरिपक्व असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम हे नागपूरमध्ये असं म्हणाले.

May 27, 2013, 08:42 PM IST