राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केलाय. 

Updated: Mar 2, 2015, 11:55 PM IST
राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला title=

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केलाय. 

तसंच मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष मराठी हवा होता, असंही राणेंनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा न करताच मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची निवड केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. मुंबईचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं या पदावर एका मराठी माणसाची नियुक्ती करणं गरजेचं असल्याचं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.
 
जनार्दन चांदुरकर यांच्या जागी मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संजय निरुपम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यानंतर नारायण राणेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

 दरम्यान, नाराज नारायण राणेंना काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशेक चव्हाण यांनी टोला लगावलाय. मराठी-अमराठी वाद अयोग्य असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय. राणेंशी आपण चर्चा करणार असल्याचंही चव्हाण यांनी नमूद केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.