www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.
संजय निरुपम यांनी या संदर्भात रिलायन्स एनर्जीचे प्रमुख अनिल अंबानी यांना पत्र लिहलंय. गेल्या काही वर्षात मुंबईत अनेकदा वीज दरात वाढ करण्यात आलीय. त्यामुळं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला वीज दराचा शॉक देण्यापेक्षा दिलासा देणं गरजेचं असल्याचं निरुपम यांनी पत्रात नमूद केलंय. यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेऊन जनतेला दिलासा दिला पाहिजे असंही निरुपम यांनी म्हटलंय.
तसंच रिलायन्सलाही वीज खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागतात हेसुद्धा अन्यायकारक असल्याचं निरुपम म्हणालेत. आजच्या मोर्चाच्यावेळी अंबानी यांनी उपस्थित राहावं अशी विनंती या पत्रात करण्यात आलीय. तसंच वीज दर कमी करण्याबाबत निर्णय न तीव्र आंदोलन आणि वेळ पडल्यास उपोषणाचा इशारा निरुपम यांनी पत्रात दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.