शरद पवारांच्या रडारावर राज्यपाल, मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. तर मजुरांसोबत बसून जेवण केले म्हणजे विकासाचे प्रश्न सुटत नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे

Updated: Apr 4, 2012, 10:09 PM IST

www.24taas.com, सातारा

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. तर मजुरांसोबत बसून जेवण केले म्हणजे विकासाचे प्रश्न सुटत नाही, असे म्हणत  पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे.

 

 

 

राज्यात काही भागात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, सूचना देऊनही राज्यपाल राज्यभवनाबाहेर पडत नाहीत. ही बाब गंभीर असल्याचे मत पवार यांनी व्यक्त करताना राज्यपालांना दुष्काळाचे गांर्भीय नाही, असा थेट आरोप पवारांनी केला. पवारांना थेट राज्यपालांना टार्गेट केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आघाडीचे सरकार असताना पवारांनी राज्यपालांना टार्गेट का केले, याची चर्चा सुरू आहे.

 

 

कोण कुठे जेवण करीत आहे, आणि काय खात आहे याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही. मी विकास  कामांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करतो, असा खोचक सवाल व्यक्त केला. अलिकडेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी सातारा दौ-यात रोजगार हमी योजनेवरील मजुरांसोबत भोजन केले होते. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी ठेचा आणि भाकरी खाऊन प्रश्न सुटत नसल्याचा टोला लगावला.