शरद पवार

राष्ट्रवादीची कर्नाटकात मुसंडी?

महाराष्ट्रात घोडदौड करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कर्नाटकात काँग्रेसला धोबीपछाड देण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. चिक्कोडीचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे.

Dec 14, 2011, 11:06 AM IST

पवारांच्या हल्ल्यावर अण्णांचं समर्थन

शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर अण्णा हजारे यांनी केलेलं वक्तव्य यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता यात भर म्हणजे या हल्ल्याचे समर्थन करण्यात आलं आहे.

Dec 6, 2011, 02:30 PM IST

पवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम

FDI बील पास झालं तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदाच होईल, असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत विरोधी पक्षांनी एफडीआयवर योग्य चर्चा घडवून आणली, तर यातून लवकर मार्ग निघेल असं पवार म्हणालेत.

Dec 5, 2011, 04:14 PM IST

शरद पवारांचे 'फॅन फॉलिंग'

जबलपूरमध्ये आयसीएआरच्या एका कार्यक्रमात पवारांच्या शेजारी सिलिंग फॅन कोसळला.यात शरद पवार थोडक्यात बचावले.

Dec 3, 2011, 03:20 PM IST

अण्णांच्या मुद्दांवर अधिक भाष्य करण्यास पवारांचा नकार

शरद पवार हल्ल्यानंतर मुंबईत परतले. अण्णांच्या मुद्दावर अधिक भाष्य करण्यास पवारांनी नकार दिला.

Nov 25, 2011, 06:25 PM IST

'हा मराठी माणसाचा अपमान'- सरनाईक

शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.

Nov 25, 2011, 06:09 PM IST

मुंबईत अण्णांच्या पुतळ्याचं दहन

दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या पुतळ्याचं दहन केलं. शरद पवारांवरच्या हल्ल्याचा कालपासूनच राज्यभरात निषेध केला जातोय.

Nov 25, 2011, 09:06 AM IST

पवारांवरील हल्ला घृणास्पद- बाळासाहेब ठाकरे

व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या भेटीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुण्यात आगमन झाले. त्यावेळेस शरद पवारांवरील हल्ला हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना प्रमुखांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Nov 24, 2011, 05:20 PM IST

शरद पवार यांच्यावर दिल्लीत हल्ला

दिल्लीमध्ये हरविंदर सिंग नामक युवकाने केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकावली.

Nov 24, 2011, 09:55 AM IST

कांबळीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे- शरद पवार

विनोद कांबळीने १९९६ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅच फिक्सिंग संदर्भात केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांचे याबाबतीत काय म्हणणं आहे यावर मी विश्वास ठेवेन असं पवार म्हणाले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कांबळीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचं पवार म्हणाले.

Nov 19, 2011, 03:46 PM IST

माथाडींची माथ्यावर छप्पर मिळणार का?

नवी मुंबईत माथाडी कामगारांसाठी दहा हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोनं एका महिन्यात घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शरद पवारांनी ही सूचना केली.

Nov 13, 2011, 03:49 PM IST

बारामती ठप्प, शरद पवार गप्प !

इंदापूर रस्त्यावरच्या काटेवाडी गावात बंद दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. काटेवाडी या शरद पवारांच्या गावातच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला.

Nov 10, 2011, 08:44 AM IST

ठाण्यामध्ये 'पवार'फुल दौरा

आगामी निवडणुकांच्या तयारीला लावण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी ठाणे शहरात दिवसभर कार्यर्कत्यांशी संवाद साधणार आहेत. शांग्रीला रिसॉर्टमध्ये पवार ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतील.

Oct 2, 2011, 01:57 PM IST