शरद पवार

शरद पवारांचा `यू टर्न`!

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

Sep 15, 2013, 07:59 PM IST

पवार-मुख्यमंत्र्यांची शब्दखेळी बिल्डरांशी संबंधीत?

शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सध्या सुरु असलेले आरोप - प्रत्यारोप हे पुण्या-मुंबईतल्या बिल्डरांशी संबधित असल्याची शंका भाजपनं व्यक्त केलीय.

Sep 13, 2013, 11:05 AM IST

'फायलीं'च्या मुद्यावर राष्ट्रवादी बॅकफूटवर!

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमकींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेलीये. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या विषयावर बोलण्यास चक्क नकार दिला.

Sep 12, 2013, 08:26 PM IST

मुख्यमंत्र्यांचा पवारांवर पलटवार!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.

Sep 11, 2013, 05:52 PM IST

मुख्यमंत्र्यावर शरद पवारांचा वार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केलीय. अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिलाय

Sep 10, 2013, 08:38 PM IST

राज्यातल्या मदरशांना अनुदान, राजकारण तापलं!

राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेना, मनसेने केलीय. तर या निर्णयाबाबत आपणाला काहीच माहिती नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.

Sep 4, 2013, 05:42 PM IST

माणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.

Aug 17, 2013, 10:08 AM IST

राज ठाकरेंनी काढला शरद पवारांना चिमटा

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात ते सात आठ महिन्यांनंतर कळतं, ते नेमके काय बोलतील याचा नेम नाही असा चिमटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला.

Aug 14, 2013, 01:58 PM IST

आरक्षणावरून पवारांचं घूमजाव, मराठा संघटनांचा विरोध!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केलाय. मराठ्यांसह समाजातील सगळ्याच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. ती मान्य नसल्याचं सांगत मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मराठा संघटनांची मागणी आहे.

Aug 13, 2013, 07:27 PM IST

MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात

मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Aug 13, 2013, 04:53 PM IST

शरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य

मालेगाव बॉम्बस्फोटातील १७ मुस्लिम तरुण आणि इशरत जहाँ व्यवस्थेचे नाहक बळी ठरले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय.

Aug 10, 2013, 06:19 PM IST

शरद पवारांना डोकं आहे का? – उद्धव ठाकरे

माझ्यासोबत निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलणार नाही. शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे तीच राहणार. सेनेची कार्यपद्धती बदलणार नाही, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची थीम पार्कची कल्पना चांगली आहे. ही कल्पना सुचायला डोकं लागतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना हाणला.

Jun 19, 2013, 10:16 PM IST

पवार मुंबईकर झाले, MCA अध्यक्षपदावर डोळा!

आयसीसी अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता शऱद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Jun 18, 2013, 06:51 PM IST

मंत्रीमहोदयांच्या स्वागताला नोटांचा पाऊस!

राज्यमंत्री झाल्याबद्दल संजय सावकारे यांच्या सत्काराला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांचा पाऊस पाडलाय. भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करताना ही नोटांची उधळण करण्यात आलीय.

Jun 14, 2013, 10:18 AM IST

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाकरी करपणार?

आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे.

Jun 11, 2013, 09:21 AM IST