www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
राज्यमंत्री झाल्याबद्दल संजय सावकारे यांच्या सत्काराला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांचा पाऊस पाडलाय. भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करताना ही नोटांची उधळण करण्यात आलीय.
राष्ट्रवादीच्या खांदेपालटात गुलाबराव देवकर यांचं मंत्रीपद काढून घेतल्यानंतर संजय सावकारे यांना मंत्रीपद बहाल करण्यात आलंय. शपथविधीनंतर पहिल्यांदाच गितांजली एक्सप्रेसनं भुसावळला पोहचलेल्या या मंत्रिमहोदयांचं रेल्वे स्टेशनवरच जोरदार स्वागत करण्यात आलं. या स्वागतासाठी केवळ हार तुऱ्यांचा आणि ढोल ताशांचाच नाही तर नोटांचाही वापर करण्यात करण्यात आला. यावेळी रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी चेंगराचेंगरी होण्याचीही शक्यता होती. पण, उन्मादात असलेल्या कार्यकर्त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारीही याठिकाणी उपस्थित होते. भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश नेमाडे हेदेखील या कार्यकर्त्यांसोबत नाचण्यात दंग झाले होते.
मुलाच्या लग्नात उधळण करणाऱ्या भास्कर जाधवांना धक्का देणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता या प्रकरणात काय करणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.