पवारांच्या वक्तव्यावर, उद्धव ठाकरेंची तोफ

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या दोनदा मतदान करा, या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तोफ डागलीय.

Updated: Mar 24, 2014, 04:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या दोनदा मतदान करा, या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तोफ डागलीय.
दोनदा मतदान करून निवडणुका जिंकणं ही तर पवारांची कला असून आत्तापर्यंत अशाच निवडणुका जिंकल्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याबाबत नवी मुंबईत केलेल्या विधानाची सीडी ठाणे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत.
किरीट सोमय्या देवेन भारतींच्या भेटीला
किरीट सोमय्या यांनी तर विशेष पोलीस महासंचालक देवेन भारती यांची भेट घेतली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शरद पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी असंही ते म्हणाले आहेत. तर नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगीच घेण्यात आली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला मतदारांना दिल्यानं वाद निर्माण झाला होता. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.