लोकसभा निवडणूक 2024

कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'

Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 18, 2024, 08:59 PM IST

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

Apr 18, 2024, 02:18 PM IST

'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे. 

 

Apr 18, 2024, 12:21 PM IST

भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली

Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.

Apr 17, 2024, 07:38 PM IST

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.

Apr 17, 2024, 06:29 PM IST

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

Apr 17, 2024, 02:20 PM IST

सांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज

Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

Apr 16, 2024, 07:14 PM IST

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.

Apr 16, 2024, 02:04 PM IST

पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी

Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय

Apr 15, 2024, 08:11 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

Apr 15, 2024, 01:58 PM IST

लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट

Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

Apr 12, 2024, 09:22 PM IST

उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग

Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं,  पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 12, 2024, 06:18 PM IST

नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.

Apr 12, 2024, 01:57 PM IST